एकाच बाजूच्या शेतकर्‍यांवर अन्याय करू नका! मानोरी येथील शेतकर्‍यांची प्रशासनाकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी ते गणपतवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूने समसमान साईड गटारे घ्यावीत आणि एकाच बाजूच्या शेतकर्‍यांवर अन्याय करू नये अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.

सदर ठेकेदाराकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूने खूणा केल्याने काही शेतकर्‍यांनी त्यावर आक्षेप घेत दोन्ही बाजूने सारख्याच साईडपट्ट्या कराव्यात, कुण्या एका बाजूने कमी-जास्त साईडपट्ट्या करू नये, दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांना सारखाच न्याय द्यावा अशी मागणी लाभधारक शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच रस्त्याच्या बाजूने असलेले विद्युत पोलही बाजूला हटावीत अशी देखील मागणी करण्यात आली आहे. सोमवारी (ता.23) नितीन चोथे, दत्तात्रय आढाव, सुनील पोटे, बाबुराव मकासरे, शिवाजी पोटे, गणेश चोथे, संजय आढाव, ज्ञानदेव आढाव, भास्कर आढाव, लहानू चोथे, संभाजी पोटे, बापूसाहेब आढाव, आप्पासाहेब आढाव आदिंसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार फसियोद्दीय शेख यांच्या आदेशानुसार तलाठी प्रवीण जाधव यांनी पाहणी केली आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 117891

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *