जिल्ह्यातील दहा पशु वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या

नायक वृत्तसेवा, नगर
पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’ संवर्गातील नाशिक विभागातील सुमारे 39 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील दहा अधिकार्यांचा समावेश आहे.

नेवाशातील वडाळ्याचे डॉ. संदीप वाजे यांची श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे. कोपरगाव पंचायत समितीतील डॉ. दिलीप दहे यांची कोपरगाव येथे डॉ. श्रध्दा काटे यांच्या बदलीने रिक्त होणार्या पदावर नियुक्ती, कोळपेवाडीचे डॉ. करण खर्डे यांची राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे, पारनेरच्या डॉ. हर्षला ठुबे यांची पुणे येथे, सिन्नरचे डॉ. विष्णू लहामटे अकोलेतील देवगाव येथे बदलून आले आहेत. देवगावचे डॉ. संतोष पिचड यांची दिंडोरीत, कोपरगावच्या डॉ. श्रध्दा काटे कोपरगाव पंचायत समितीत डॉ. दहे यांच्या बदलीने रिक्त होणार्या जागेवर आल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटेचे डॉ. प्रसाद शेळके अकोलेतील शेंडी येथे बदलून येत आहेत. अळकुटीचे डॉ. संकेत भोर संगमनेरातील जवळे कडलग येथे, अकोलेतील शेंडी येथे कार्यरत डॉ. सपना नेहे यांची बदली सिन्नर येथे, तर टाकळीमियाँचे डॉ. वैभव वाकडे यांची बदली राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे करण्यात आली आहे.
