मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अत्यंत कमी कालावधीत नावारूपास आलेल्या संगमनेरातील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांच्या देखरेखीखाली मोफत ऍन्जिओग्राफी आणि ऍन्जोप्लास्टी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत.

या शिबिराद्वारे रुग्णांना अनेक फायदे मिळणार आहेत. जगातल्या सर्वोत्कृष्ट कॅथलॅबवर तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया, जागतिक दर्जाच्या आधुनिक वैद्यकीय सुख-सुविधा, शस्त्रक्रियेनंतर आपल्याच गावात पुर्नतपासणी आदी फायदे अगदी मोफत मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेडिकव्हर हॉस्पिटल्सतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 99215 99215 या क्रमांकावर संपर्क करावा.

Visits: 151 Today: 1 Total: 1954631

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *