राहुरी तालुक्यात मोटार चोर्‍यांचे सत्र सुरू

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील प्रवरा काठावरील विहिरीतील पाणबुडी आणि नदी काठावरील पाणबुडी मोटार चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. संक्रापूर येथील शेतकरी देविदास देसाई यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संक्रापूर येथील शेतातील विहिरीतून 27 ते 28 जानेवारी दरम्यान रात्री 1 ते 6 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी विहिरीतील 5 अश्वशक्तीची पाणबुडी आणि 125 फूट केबलची चोरी करुन अंदाजे आठ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. दरम्यान, चोरलेली वीज मोटार भंगारात विकली जात असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर चोर्‍यांचा तपास लागत नसल्याने शेतकरी तक्रार देण्यासही टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वीज मोटार चोरणारे व त्या विकत घेणारांवरही कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Visits: 113 Today: 1 Total: 1110750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *