पद्मावती हिरोमध्ये महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
होंडा कंपनीपासून विभक्त होऊन दहा वर्षे पूर्ण केली आणि तब्बल दहा कोटी ग्राहकांचा विश्वास मिळविला. हे दैदीप्यमान यश मिळविल्याबद्दल नुकताच वचन पूर्ती कृती महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने हिरो कंपनीने खास योजना ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या होत्या, त्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती संगमनेर शहरातील पद्मावती हिरो दालनाचे संचालक सुमित मणियार यांनी दिली.

9 ऑगस्टपर्यंत असलेल्या महोत्सवामध्ये मोटारसायकलवर 2 हजार रुपये व स्कूटरवर 5 हजार रुपयांची सूट देण्यात आली. यामुळे एकाच दिवसात आश्वी, साकूर, राजूर, कोतूळ व मुख्य शाखा पद्मावती मिळून 58 वाहनांची विक्रमी विक्री झाली. तसेच सर्व्हिसिंगमध्ये 324 रुपयांची सर्व्हिस अवघ्या 99 रुपयांत करून देण्यात आली. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळातही ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. असेच ग्राहकांचे सदैव सहकार्य मिळत मिळो आणि पद्मावतीतर्फे नियमानुसार कंपनीकडून आलेल्या योजना वितरित करण्यात येतील असे सुभाष मणियार यांनी सांगितले. सदर महोत्सवासाठी पद्मावती हिरोचे व्यवस्थापक संदीप अभंग, एल अँड टी फायनान्स कंपनीचे हरीश गोरे, हिरो कंपनी फायनान्सचे दीपक गुंजाळ, श्रीराम फायनान्स कंपनीचे गोरक्ष बालोडे, मन्नपूर्णम फायनान्सचे मंगेश चौधरी, स्पेअर पार्ट मॅनेजर नाना वाळुंज, सर्व्हिस मॅनेजर सतीश शिंदे, सेल्समन सागर थोरात, गगन चौधरी, आरती टेकाडे, सोनाली रंधे, वर्षा गाडे, मधुरा नगरकर आदिंनी परिश्रम घेतले.

Visits: 10 Today: 1 Total: 80193

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *