मसालाकिंग डॉ.दातार यांना रिटेल एमई आयकॉन्स अ‍ॅवॉर्ड

नायक वृत्तसेवा, नगर
दुबईस्थित अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना रिटेल एमई माध्यम गृहातर्फे नुकतेच प्रतिष्ठेच्या रिटेल एमई आयकॉन्स अ‍ॅवॉर्डने गौरवण्यात आले.

डॉ. दातार यांनी मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका (मिडल इस्ट अँड नॉर्थ आफ्रिका-मीना) विभागात रिटेल उद्योगाच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दुबईच्या बिझनेस बे भागातील जेडब्ल्यू मार्क्विस येथे नुकत्याच झालेल्या शानदार समारंभात रिटेल एमईतर्फे मीना विभागातील आघाडीच्या रिटेल लिडर्सची यादी जाहीर करण्यात आली. डमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सरव्यवस्थापक मुहम्मद-अल-तहैने यांच्या हस्ते व दुबई डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगच्या अलायन्स अँड पार्टनरशिप विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लैला मुहम्मद सुहैल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यम गृहांपैकी असणार्‍या रिटेल एमई तर्फे आमच्या कामाची दखल घेतली जाणे हा मोठा सन्मान आहे. संयुक्त अरब अमिरातीत भारतीय मसाल्यांबाबत आघाडीचे नाव असलेल्या आमच्या अल अदील समूहासाठीही आणखी एक अभिमानास्पद कामगिरी आहे. या पुरस्काराच्या निवडीत अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्त्वे आचरली जात असल्याने आमच्यावर अधिक उत्तम कामगिरी करुन दाखवण्याची जबाबदारी आली आहे. आमच्या ग्राहकांना सामाजिक जबाबदाररित्या वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी हा पुरस्कार प्रोत्साहक असल्याचे नमूद करुन हा पुरस्कार एकप्रकारे पत्नी वंदना, मुले हृषीकेश व रोहित आणि अल अदीलचा सर्व कर्मचारी वर्ग यांच्या पाठबळाचेच प्रतिबिंब असल्याचेही सांगितले.

Visits: 5 Today: 1 Total: 30561

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *