जेऊर पाटोदा-धारणगाव रस्ता वर्षभरात फुटला रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून साफसफाईची मागणी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जेऊर पाटोदा ते धारणगाव जिल्हा मार्ग क्रमांक आठवर शासनाने 703 लक्ष रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी हा रस्ता तयार केला. मात्र या कामास वर्ष होत नाही तेच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून धारणगाव पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपूर, धारणगाव, सोनारी, रवंदे या प्रा.जि.मा. आठवरच्या 10 किलोमीटर रस्त्यास सातशे तीन लक्ष रुपये 2020 मध्ये खर्च करण्यात आले. एकाच वर्षात धारणगाव येथील पुलाच्या नळ्यांवरील स्लॅब फुटून रस्ता खचल्याने काम गुणवत्तेप्रमाणे झाले की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असे नाव बहाल करण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या रस्त्यांचा विकास या योजनेंतर्गत करण्यात येतो. यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रण असतानाही एकाच वर्षांत पुलाचा स्लॅब खराब कसा होतो हा संंशोधनाचा विषय आहे. देखभाल दुरुस्ती कालावधी हा पाच वर्षे असून 21 ठिकाणी मोरीच्या कामाचा समावेश आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वेड्या बाभळीची तत्काळ सफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Visits: 124 Today: 2 Total: 1102362

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *