भांड यांना उद्योग विभूषण पुरस्कार मिळणे गौरवास्पद ः खा. गोडसे

नायक वृत्तसेवा, राहुरी
ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात प्रगतीचे शिखर गाठणे खरेतर सोप्पं नाही. मात्र, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या छोट्याशा गावातून उद्योजक गणेश भांड यांनी या व्यवसायात प्रगती केली आहे. कोविड काळात देखील त्यांच्या प्रगतीचा आलेख उंच आहे आणि त्याचीच दखल घेत भारतरत्न जे. आर. डी. रतन टाटा उद्योग विभूषण पुरस्कार प्राप्त झाला ही बाब खरचं गौरवास्पद आहे असल्याचे प्रतिपादन नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी काढले.

चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना भारतरत्न डे. आर. डी. रतन टाटा उद्योग विभूषण पुरस्कार प्रात झाल्याने त्यांचा नाशिक येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी खासदार गोडसे यांनी भांड यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षस्थानी शिवसेना नेते तथा माजी मंत्री बबन घोलप होते. तर परिवहन विभागाचे उत्तम जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, गणेश शेळके, नगसेवक रमेश धोंडगे, अशोक पोरजे, कामगार नेते जयंत गाडेकर, डहाणूचे पोलीस पाटील विघ्नेश बारे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, राहुरी तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे, भगवान गडाख, रामभाऊ जगताप, नगरसेवक केशव पोरजे, आदित्य हंडोरे, कैलाश पोरजे, अरुण बोराडे, सोमनाथ बेरड, प्रकाश बारी, नानाजी बागुला, संजय पोरजे आदी मान्यवर उपस्थित होते.
