अकोले पोलिसांत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील दोन विवाहितांना सासरच्यांनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी अकोले पोलिसांत एकूण नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत पहिल्या घटनेत रोहिणी नीलेश डोंगरे (वय 22, रा.कौठे बुद्रुक, ता.संगमनेर, हल्ली रा.वाघापूर, ता.अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्न झाल्यानंतर सासरी टिटवाळा (जि.ठाणे) येथे नांदत असताना दोन महिन्यांतच पती नीलेश सुदाम डोंगरे यांनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तसेच भाया अशोक सुदाम डोंगरे, जाव दीपाली अशोक डोंगरे यांनी तुला स्वयंपाक नीट येत नाही असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली. तसेच सासू ताराबाई सुदाम डोंगरे, सासरे सुदाम निवृत्ती डोंगरे यांनी माहेरून पैसे आणत नाही म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. यावरुन पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात गुरनं 242/2021 भारतीय दंडसंहिता कलम 498, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक के. एल. तळपे हे करत आहे.

तर दुसर्‍या घटनेत आम्रपाली संतोष इथापे (रा.सावरगाव पाट, ता.अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्न झाल्यानंतर सासरी चाकण (जि.पुणे) येथे नांदत असताना मे, 2014 पासून दोन ते जून, 2020 पर्यंत सासू चंद्रभागा दत्तात्रय इथापे, सासरे दत्तात्रय तुकाराम इथापे (दोघे रा.म्हसवंडी, ता.संगमनेर) व रवींद्र दत्तात्रय इथापे, पती संतोष दत्तात्रय इथापे (सर्व रा.चाकण) यांनी नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आण व आणखी सोने घेऊन ये असे म्हणून वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घराबाहेर काढून दिले. यावरुन पोलिसांनी वरील चौघांविरोधात गुरनं.243/2021 भारतीय दंडसंहिता कलम 498, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोंदे हे करत आहे.

Visits: 184 Today: 1 Total: 2056484

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *