संगमनेरात भाजपचे चक्का जाम आंदोलन! ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार विरोधात निदर्शने..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) अतिरिक्त व स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे. याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात आज (शनिवार ता.26) भाजपच्यावतीने चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. त्यानुसार संगमनेरात भापजकडून प्रांताधिकार्यांना निवेदन देवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबतची बाजू सक्षमपणे मांडली नाही. तसेच न्यायालयाला हवी असलेली माहिती देखील वेळेत पुरवली नाही. यामुळे न्यायालयाने आरक्षण रद्द केले. या निर्णयामुळे समाजावर मोठा अन्याय झाला आहे. याचा निषेध करुन सरकारने ओबीसी प्रवर्गातील घटकांची जनगणना करावी आणि इम्पेरियल डेटा उपलब्ध करुन देवून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, श्रीराम गणपुले, शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, सीताराम मोहरीकर, दीपक भगत, मेघा भगत, संपत गलांडे, गोरक्ष कापकर, बालाजी लालपोतू, वाल्मिक शिंदे, डॉ.महेंद्र कोल्हे, बाबुराव खेमनर, नारायण बुरुंगले, संजय भालेराव, जगन्नाथ शेटे, अमित गुप्ता, राजेंद्र सांगळे, राम जाजू, प्रशांत वाडेकर, अभिजीत पिंगळे, श्याम कोळपकर, निसार शेख, दिलीप रावळ, दीपेश ताटकर, सुनील खरे, विकास गुळवे, सोमनाथ परदेशी आदिंसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.