महाराष्ट्र पत्रकार संघाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

महाराष्ट्र पत्रकार संघाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने सी न्यूज मराठीचे संचालक, संपादक गोरक्षनाथ मदने, संचालक बाळासाहेब गडाख, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ.जगदीश वाबळे यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून नुकतेच गौरविण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय नवले, वर्पे इन्शुरन्स अँड मल्टिसर्व्हिसेसचे संचालक ज्ञानेश्वर वर्पे, हरिभाऊ मंडलिक, आधार फौंडेशनचे सोमनाथ मदने, सुखदेव गाडेकर उपस्थित होते. संगमनेरातील सी न्यूजच्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात कोविड योद्धे संपादक गोरक्षनाथ मदने यांनी सी न्यूज मराठीच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ.जगदीश वाबळे यांनी कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवेत जराही खंड पडू दिला नाही. आरोग्य, महसूल, पोलीस आणि माध्यम या सर्वांचे कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचे योगदान असल्याचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे यांनी नमूद केले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नवले यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले तर आभार संचालक गडाख यांनी मानले.

Visits: 162 Today: 1 Total: 2121309

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *