कोर्हाळेत वृद्ध दाम्फत्याची निर्घृण हत्या..

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोर्हाळे येथील चांगले वस्तीवरील शशीकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधूबाई शशीकांत चांगले (वय 55) या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना शनिवारी (ता.26) सकाळी उघडकीस आली आहे.

शशीकांत चांगले आणि सिंधूबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी असून शुक्रवारी (ता.25) ते आपल्या मुलांना भेटून घरी आले. सकाळी लवकर उठून शेतात काम करण्यासाठी जाणारे पती-पत्नी आज का लवकर उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊन पहिले तर दोघेही रक्ताने भरलेले आणि त्यांच्या डोक्याजवळ पावडे रक्तानी भरलेले पाहिल्यानंतर तत्काळ राहाता पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे व पोलीस उपअधीक्षक संजय सातव हे मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पती-पत्नीवर पावड्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यांच्या हत्येचे कारण आद्यप अस्पष्ट आहे.

