संगमनेरात 26 हजारांची अवैध दारु पकडली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील मेहेर कॉम्प्लेक्स भिंतीजवळ अवैधरित्या दारुविक्री करताना सोमवारी (ता.19) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एकास शहर पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून 26 हजार 84 रुपयांच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यता आल्या आहेत.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये संचारबंदी लागू असून प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी देखील मनाई असताना शहरातील मेहेर कॉम्प्लेक्स भिंतीजवळ दीपक रमाकांत (रा.पार्वती कॉम्प्लेक्स) हा अवैधरित्या देशी-विदेशी दारुविक्री करताना आढळून आला. यावेळी त्याच्याकडून 26 हजार 84 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी पोलीस शिपाई सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुरनं.210/2021 भादंवि कलम 188/269, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग अधिनियम 1987 तसेच मु.प्रो.अ‍ॅ.65-ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खाडे हे करत आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 115923

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *