माळी चिंचोरा येथे पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न पाईपलाईनवरून बैलगाडी घातल्याचा संशय; नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा
पाईपलाईनवरून बैलगाडी घातल्याच्या संशयावरून भावासह पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माळी चिंचोरा (ता.नेवासा) येथे नुकतीच घडली आहे.


याबाबत भाग्यश्री विशाल बोरुडे (रा.माळी चिंचोरा, ता.नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. माळी चिंचोरा शिवारात शेत गट क्रमांक 321 व 322 मध्ये पती विशाल, सासू मीरा, सासरे रमेश व दीर निखील बोरुडे असे एकत्रित कुटुंबात राहतो. शेजारीच चुलत सासरे दत्तात्रय रंगनाथ बोरुडे हेही कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या पाईपलाइनवरून कोणी तरी बैलगाडी घातली. या कारणावरून दत्तात्रय बोरुडे यांनी भाग्यश्री बोरुडे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागले. त्यांना समजावून सांगत असताना, निखील यांना दत्तात्रय बोरुडे यांनी लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी झालेला आरडाओरडा एकूण दत्तात्रय यांची पत्नी आशाबाई, मुलगा संकेत लोखंडी फावडे घेऊन आला. त्याने निखीलच्या डोक्यावर फावडे मारून गंभीर जखमी केले. दत्तात्रय यानेही दुसरे फावडे आणून मीरा यांना जीवे मारण्याची धमकी देत, फावडे डोक्यात मारले. त्याही गंभीर जखमी झाल्या. आशाबाई हिनेही मीरा यांना लाथाबुक्याने मारहाण केली. दत्तात्रय यांनी रमेश यांच्या छातीवर फावडे मारल्याने, त्यात तेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून दत्तात्रय बोरुडे, आशाबाई बोरुडे व संकेत बोरुडे यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.

Visits: 92 Today: 2 Total: 1109571

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *