पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळींची अवघ्या दोनच महिन्यांत बदली वासुदेव देसलेंची लागली वर्णी; कार्यपद्धतीकडे कोपरगाव शहरवासियांचे लागले लक्ष

अक्षय काळे, कोपरगाव
गोदावरीच्या तिरावर वसलेल्या सहकाराने समृद्ध असलेल्या कोपरगाव शहराला नव्याने लाभलेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची अल्प कालावधीतच बदली झाल्याने शहरात विवध चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या दोन महिन्यांतच त्यांची बदली शिर्डीच्या साईबाबा मंदिर सुरक्षा याठिकाणी झाली आहे. त्यांच्या जागी तेथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची वर्णी लागली आहे. परंतु, वाढती गुन्हेगारी व कोरोना संकट खमके पोलीस निरीक्षक म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक देसले कसे हाताळतात याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची कोतवाली पोलीस ठाणे येथे 11 नोहेंबर रोजी बदली झाली होती. त्यानंतर अहमदनगर नियंत्रण कक्ष येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून बदलून आलेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी मिळाली. 27 नोहेंबर रोजी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आदेश काढल्यानंतर त्यांनी तत्काळ कारभार हाती घेतला होता. परंतु, अवघ्या दोन महिन्यांतच त्यांची बदली शिर्डीच्या साईबाबा मंदिर सुरक्षा याठिकाणी झाली.

तर याठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची सूत्रे देण्यात आली आहे. याचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख पाटील यांनी मंगळवारी (ता.23) काढला आहे. यामुळे अल्पावधीतच गवळी यांची बदली झाल्याने शहरवासियांत विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती गुन्हेगारी व कोरोना संकट खमके पोलीस अधिकारी देसले कसे हाताळतात याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव शहराची समृद्ध शहर म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. विशेष म्हणजे येथील सहकार व राजकारणामुळे कायमच चर्चेत असते. त्यामुळे शहरवासियांच्या मनातील भीती दूर करुन गुन्हेगारी कशी हद्दपार करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Visits: 105 Today: 1 Total: 1105743

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *