खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी पंधरा लाख देणार ः आ.डॉ.लहामटे
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील प्रसिद्ध असणार्या सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी 15 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी दिली आहे.
सावरगाव घुले ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सोसायटीचे अध्यक्ष लहानू घुले, शेतकी संघाचे संचालक अर्जुन घुले, उपसरपंच नामदेव घुले, माजी सरपंच रेवजी घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घुले, भाऊसाहेब खरात, नूतन सदस्य राजू खरात, राजेंद्र घुले, सीमा कडू, अलका घुले, प्रणिता घुले, घमाजी भुतांबरे आदी उपस्थित होते. खंडोबा देवस्थानच्यावतीने या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत देवस्थानचे अध्यक्ष सीताराम घुले केले तर प्रास्ताविक सचिव गोरक्षनाथ मदने यांनी केले. याप्रसंगी आमदार लहामटे व जिल्हा परिषद सदस्य फटांगरे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. तर नूतन उपसरपंच घुले यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या आमदारांकडे मांडली. यावर त्यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच पठारभागातील रस्ते, पाणी, वीज हे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पठारभागावर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे आमदार लहामटे यांनी सांगून, विलोभनीय खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर देवस्थानचा ‘क’ वर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवा. पर्यटन स्थळांतर्गत निधी उपलब्ध करुन देतो असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य फटांगरे यांनी दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थानचे विश्वस्त गुलाब घुले, पालखी सोहळ्याचे सदस्य किरण घुले, राजू घुले, गणेश घुले, बाबासाहेब कडू, माजी सरपंच माधव घुले, कैलास बोर्हाडे, भास्कर कोठवळ, नितीन घुले, अनिकेत घुले, सोमनाथ फापाळे यांनी परिश्रम घेतले. शेवटी विश्वस्त नामदेव घुले यांनी आभार मानले.