निमगाव खैरी शिवारातील अपघातात एक ठार
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावर निमगाव खैरी गावच्या शिवारातील पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने समोरुन येणार्या जीपला जोराची धडक दिली. या अपघातात निमगाव खैरी येथील एकजण जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावर निमगाव खैरी गावच्या शिवारातील पेट्रोल पंपाजवळ काळीपिवळी जीप (क्र.एमएच.17, टी.5573) हिच्यावरील चालकाने बेशिस्त वाहन चालवून जीप (क्र.एमजीएम.5457) हिस जोराची धडक दिली. या अपघातात जीपमधील हरिभाऊ बाळासाहेब भालेराव (वय 25) हा तरुण ठार झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ गणेश बाळासाहेब भालेराव याने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित जीप चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे करत आहेत.