कोपरगावातील लहान पुलाला अवजड वाहतुकीमुळे धोका

कोपरगावातील लहान पुलाला अवजड वाहतुकीमुळे धोका
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव शहरात असलेल्या गोदावरी नदीवरील लहान पुलाला अवजड वाहतुकीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने अवजड वाहतूक होऊ नये यासाठी उपाययोजना देखील केल्या आहेत. परंतु अवजड वाहतूक करणार्‍या वाळू डंपरमुळे पुलाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.


गोदावरी नदीवर माजी आमदार अशोक काळे यांनी पाठपुरावा करुन कोट्यवधी रुपये खर्च करून पुलाची उभारणी 10 वर्षांपूर्वी केली आहे. यामागे जनहिताची भूमिका होती. मात्र त्यानंतर या पुलावरुन अवजड वाहतूक होणार नाही यासाठी काळजी घेतली. पण गेल्या काही वर्षांत या पुलावरुन रात्री-बेरात्री वाळूतस्कर मोठ्या प्रमाणावर डंपरने वाहतूक करत आहे. शहरात येणारा व बाहेर जाणारा गोदावरी नदीवरील हा एकमेव पूल असतानाही पोलीस प्रशासन फार काही कारवाई करत नाही. पालिका देखील कमकुवत गल्डर टाकून प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र वाळूतस्कर डंपरने धडक देऊन पाडून टाकत असल्याने आता या पुलावर असलेल्या जोडालाच धोका निर्माण झाल्याचे दिसून येत धोकादायक ठरू शकतो. यामुळे जीवितहानी देखील होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाचा असणार्‍या गोदावरी नदीवरील पुलाचे आयुष्यमान कमी होत असल्याने या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 27386

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *