साई संस्थान कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनास ‘मनसे’चा पाठिंबा

साई संस्थान कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनास ‘मनसे’चा पाठिंबा
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीच्या साईबाबा संस्थान कर्मचार्‍यांनी रविवारी (ता.13) पुकारलेल्या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.


मनसेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तथा शिर्डीचे नगरसेवक दतात्रय कोते, शहर उपाध्यक्ष विकी कांबळे, ज्ञानेश्वर पवळे, किशोर पाडेकर, गोरख पवार, प्रशांत ठोंबरे, संपत हतांगळे, यश कोते आदी मनसेचे सैनिक व पदाधिकार्‍यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देत पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, या आंदोलनास मनसेचे जिल्हाध्यक्ष व संपर्क नेते अनिल चितळे, सचिन डफळ, देवीदास खेडकर, बाबा शिंदे, ज्ञानेश्वर गाढे, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, श्याम गोहाड, महेश ठाकरे, नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे आदी मनसेचे पदाधिकारी व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर मोर्चा माजी मंत्री बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, अशी माहिती नगरसेवक कोते यांनी दिली आहे.

Visits: 88 Today: 1 Total: 1112274

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *