आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा माऊंटेबिअरिंग असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी (ता.11) आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी 9 वाजता अहमदनगर शहराजवळील गोरक्षनाथ व मांजरसुंबा गडावर पर्वत पूजन व पर्वतारोहण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट यांनी दिली आहे.

जगभरातील गिर्यारोहक, दुर्गप्रेमी, पर्वतप्रेमी व भटकंती करणारे असे सर्वजण पर्वतांबद्दलची कृतज्ञता विविध उपक्रमांद्वारे व्यक्त करतात. अहमदनगर जिल्हा माऊंटेबिअरिंग असोसिएशनच्यावतीने या दिवशी वृक्षारोपण, गीत गायन, जैवविविधता या विषयांवर व्याख्यनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच माझे पहिले गिर्यारोहण किंवा लक्षात राहिलेली डोंगरभेट या विषयावर शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ई-मेलद्वारा निबंध संकलित केले जाणार असून, स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त गिरीप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष वसंत झावरे, सचिव प्रशांत कोते, खजिनदार किरण कडू, सहसचिव गणेश शिंदे, सदस्य हिंदवी परिवार जिल्हाध्यक्ष अमित धाडगे, संभाजी जाधव, गौतम गांधी, अविनाश खडामकर, बाळासाहेब डोंगरे आदिंनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *