थोरातांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी जोमाने कामाला लागा ः नागवडे नेवासा येथे काँग्रेस बळकटीकरण सप्ताह बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, नेवासा
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा येथे काँग्रेस बळकटीकरण सप्ताह निमित्ताने आयोजित बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी थोरात यांना भावी मुख्यमंत्री बनविण्यासाठी व काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांनी केले.
नेवासा येथील प्रणाम सभागृहामध्ये झालेल्या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र नागवडे हे होते. तर काँग्रेसचे समितीचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, अनुसूचित-जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, अंकुश कानडे, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, प्रभारी सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, गणपत सांगळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आलेल्या सर्व काँग्रेस पदाधिकार्यांचे शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी प्रास्ताविक करत नेवासा तालुक्यात सप्ताहभर चालणार्या कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. कोरोनाच्या काळात योगदान देणार्यांचा सन्मान ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन करण्यात आला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षासाठी निष्ठेचे प्रमाणच असून काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी व वाढीसाठी मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी यावेळी बोलताना केले. महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी देणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले. काँग्रेसचे नेते अंकुश कानडे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. या बैठकीस सुदाम कदम, प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, सचिन बोर्डे, मौलाना शेख, रमेश जाधव, एनएसयूआयचे अध्यक्ष सौरभ कसावणे, युवक कार्याध्यक्ष आकाश धनवटे, समीर शेख आदी उपस्थित होते.