अकोले तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडी जाहीर
अकोले तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडी जाहीर
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी जाहीर केल्या आहेत.
![]()
अकोले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी भानुदास तिकांडे, युवक तालुकाध्यक्षपदी रवींद्र मालुंजकर, शहराध्यक्षपदी अमित नाईकवाडी व जिल्हा उपाध्यक्षपदी बबन वाळुंज यांची वर्णी लागली आहे. त्यांना वर्पे यांच्या हस्ते व आमदार डॉ.किरण लहामटे आणि ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या पदाधिकार्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. बरेच दिवस निवड होऊनही अधिकृतरित्या काम करता येते नसल्याने संघटनेत मरगळ आली होती. आता तालुका पातळीवर निवडी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
![]()
