समतानगर रस्त्याची दुरवस्था; मनसेकडून आंदोलनाचा इशारा

समतानगर रस्त्याची दुरवस्था; मनसेकडून आंदोलनाचा इशारा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव नगरपालिका हद्दीतील समतानगर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वाहन घेऊन सोडा परंतु घरापर्यंत पायी जाणे देखील अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अथवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.


समतानगर रहिवाशांनी मनसे उपशहराध्यक्ष अनिल गाडे यांना सविस्तरपणे समस्या सांगितल्या. त्यानंतर गाडे यांनी शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्यासोबत या विषयावर चर्चा करत पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यास समतानगर रस्त्याच्या सत्य परिस्थितीचे छायाचित्र दाखवून रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे सांगितले. अन्यथा चिखलात बसून मनसे स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर पालिका अधिकार्‍यांनी परिस्थिती लक्षात घेता दोन दिवसांत तेथे मुरुम टाकून रस्ता व्यवस्थित करून देणार असल्याचे आश्वासन दिले.

Visits: 82 Today: 1 Total: 1115249

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *