ख्रिस्ती समाजाने कायम माणुसकी धर्म जोपासला ः आ.डॉ.तांबे
ख्रिस्ती समाजाने कायम माणुसकी धर्म जोपासला ः आ.डॉ.तांबे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. मात्र या संकटात ख्रिस्ती समाजाने आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला मदतीचा हात देताना विविध गरजेच्या वस्तू पुरविल्या. या संकटकाळात माणुसकीचा धर्म जोपासणार्या या समाजाने कायम मानवता वाढीसाठी काम केले असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केले आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने कोरोना संकटात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींचा आमदार डॉ.तांबे व नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले होते. तर व्यासपीठावर आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, सेंटमेरी धर्मग्राम प्रमुख सायमन शिणगारे, फादर अल्वीन, ग्रेगरी केदारी, शिवाजी लांडगे, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.