उंबरेत रंगला ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील उंबरे येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमात महिलांनी पैठणी साडी व चांदीचे नाणे जिंकून आनंद लुटला.

नारीशक्ती महिला मंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवात सुमारे ४० महिलांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी खुले व्यासपीठ निर्माण केले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी जगदंबा देवीची मिरवणूक, फेटे परिधान केलेल्या महिलांचे लेझीम व दांडिया कार्यक्रमाने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात संगीत खुर्ची, जिलेबी खाणे, धावणे, गरबा दांडिया, जेष्ठ महिलांसाठी पाऊली-फुगडी यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.वैशाली पठारे, अंकिता
मुंडलिक, निता गोरे यांच्यासह अनेक महिलांनी विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली.सुत्रसंचालन गणेश हापसे व आप्पासाहेब ढोकणे यांनी केले. विजू गुरव आणि बंटी गुरु यांनी आरतीसाठी परिश्रम घेतले. महादेव मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ व गणेश मित्र मंडळाने विशेष सहकार्य केले.

Visits: 64 Today: 2 Total: 1106032
