लिपिकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नायक वृत्तसेवा, देवळाली प्रवरा
राहुरीतील एका शाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या लिपिकावर विनयभंगाचा आरोप केला आहे. या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी पीडित विद्यार्थिनी दहावीचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी शाळेत आली होती.त्यावेळी शाळेच्या लिपिकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीने केला आहे. या विद्यार्थिनीने शाळेच्या अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. अधीक्षकांनी ही तक्रार मुख्याध्यापकांकडे वर्ग केली.आरोपी लिपिकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. शिक्षण विभागानेही या प्रकरणी अहवाल मागवला आहे.

दरम्यान, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी शाळेला भेट देऊन पीडित मुलीला दिलासा दिला आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाने संबंधित लिपिकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी साळवे यांनी केली आहे.

Visits: 52 Today: 1 Total: 1107825
