रस्त्याच्या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करा :  शेख

नायक वृत्तसेवा, साकुर 
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक ते साकूरफाटा या रस्त्यावर अनेक ठिकाणी साईडपट्ट्याच काढलेल्या नाहीत. त्यामुळे या साईड पट्ट्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आ.अमोल खताळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
साईड पट्ट्याच नसल्याने रस्त्यावरुन दोन मोठी वाहने पास  होण्यास अडथळा निर्माण होत आहे.तसेच वाहन रस्त्यावरुन खाली उतरवताना साईडपट्टीच नसल्याने डांबरी रस्त्यालगत कपार निर्माण झाल्याने धोक्याचे झाले आहे.दुचाकीस्वारांना देखील वाहन चालवताना कसरत   करत वाहन चालवावे लागते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे अनेक अपघात देखील घडत आहे.विशेष करुन साकूर ते मांडवे या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली असुन साईडपट्ट्या नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे.
यामुळे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आ. अमोल खताळ  यांचे लेखी निवेदनाद्वारे याकडे लक्ष वेधले असुन मांडवे बु येथील तालुका हद्द ते नाशिक-पुणे महामार्गावरील साकूरफाटा पर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.आ. अमोल खताळ यांनी तत्काळ संगमनेरच्या सावर्जनिक बांधकाम विभागाला  सुचना केल्या आहेत.यावेळी भाजपा कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड.अमित धुळगंड उपस्थित होते.
Visits: 141 Today: 1 Total: 1917597

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *