इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.दीपाली पानसरे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षपदी डॉ.दीपाली प्रवीणकुमार पानसरे यांची नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या महिलांची संघटना म्हणून इनरव्हील क्लबचा लौकिक आहे. यानुसारच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या इनरव्हील क्लबने कायमच समाजहिताचे उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे. रक्तदान शिबिर, महिलांचे सबलीकरण, गरजूंना मदत व शालेय साहित्याचे वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. या संघटनेच्या संगमनेर अध्यक्षपदी डॉ.दीपाली पानसरे यांची निवड झाल्याने सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Visits: 196 Today: 1 Total: 2128955

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *