नमो नेत्र संजीवनी तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सेवा पंधरवाडा निमित्त घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी तपासणी शिबिर भाजपाच्या शहराध्यक्षा पायल आशिष ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत ‘सेवा पंधरवाडा’ अभियान राबवण्यात आले.या अभियानाअंतर्गत लोकपयोगी, लोककल्याणकारी उपक्रम संपूर्ण देशभरात सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या संगमनेर शहर मंडलाच्या वतीने आरोग्य शिबिर करण्याचा संकल्प होता. त्यानिमित्ताने सेवा पंधरवड्यातील नमो नेत्र संजीवनी नेत्र तपासणी शिबिर बुधवारी संगमनेर भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने शहराच्या अध्यक्षा पायल आशिष ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात आलेल्या रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी अनुभवी नेत्ररोग तज्ञांकडून करण्यात आली.

यावेळी रुग्णांना योग्य मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले. काही रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड देखील करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर मंडलातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 82 Today: 1 Total: 1412257
