ग्रामीण रुग्णालयात आधुनिक सुविधा मिळणार! आ.सत्यजित तांबे याच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात १०० बेड चे अत्याधुनिक रुग्णालयाचे काम सुरू असून घुलेवाडी व साकुर येथील आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मागणी केली. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या उत्तरात दोन्ही ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहील असे सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्याकरता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. घुलेवाडी येथे शंभर बेडचे अद्यावत रुग्णालय श्रेणीवर्जित करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी, औषधे यांची कसलीही अडचण येणार नाही तसेच साकुर येथे सध्या १५ बेडची व्यवस्था असलेल्या रुग्णालयासाठी नव्याने ३० बेडची मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, औषधे सर्व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील असे ते म्हणाले.

Visits: 97 Today: 1 Total: 1098677
