निलम खताळ यांनी केले पवार कुटुंबियांचे सांत्वन

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्यातील साकुर शिवारातील पवार वस्ती येथे अंजनाबाई सदाशिव पवार (वय ७०) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली होती. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच निलम खताळ यांनी तातडीने पवार कुटुंबियाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

घटना कशी घडली? याबाबत पवार परिवाराकडून निलम खताळ यांनी माहिती घेतली. तसेच पवार कुटुंबियांना धीर दिला. यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रौफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष बुवाजी खेमनर, सुभाष भुजबळ, मच्छिंद्र खेमनर, भीमराज जाधव, विकास पवार, सुनिल इघे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 104 Today: 1 Total: 1107974
