राहुल ढेंबरे यांचा राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरव 

नायक वृत्तसेवा, साकूर 
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  रविवारी कोल्हापूर येथील  राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात राहुल बाजीराव ढेंबरे यांचा राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे यांचे ‘लोकराजा राजश्री शाहू महाराज समजून घेताना’ या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. यावेळी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडीचे प्राचार्य डॉ.  प्रशांतकुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार तसेच सामाजिक क्षेत्रातील युवा नेतृत्व आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक,प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे  यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, प्रा. किसन कुराडे, डॉ.सोमनाथ कदम, भरत लाटकर, डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके, विश्वास तरटे,  अर्हंत मिणचेकर, किशोर पोवार, दिनकर लोहकरे, राजेंद्र बस्ते, बाजीराव ढेंबरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Visits: 141 Today: 2 Total: 1111308

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *