रोटरी क्लब संगमनेरचे महारक्तदान शिबिर संपन्न अभूतपूर्व प्रतिसाद; 107 दात्यांनी केले रक्तदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक सेवेच्या कार्यात नेहमी अग्रभागी असणार्‍या रोटरी क्लबच्यावतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी रोटरी क्लब, रोटरी इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक साहेबराव नवले यांचे हस्ते फीत कापून शिबिराची सुरुवात करण्यात आली.

रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर व साई आशीर्वाद इंडस्ट्रीज संगमनेर औद्योगिक वसाहत अशा दोन ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी अनुक्रमे 55 व 52 असे एकूण 107 दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी बोलताना उद्योजक नवले यांनी रोटरी क्लबतर्फे होत असलेल्या सामाजिक कामांचे कौतुक केले. तसेच क्लबतर्फे होणार्‍या पुढील उपक्रमांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी उपस्थित रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. तसेच या रक्तदात्यांचे आभार मानले. रक्तदानाविषयी समाजात असलेल्या गैरसमजांबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांसाठी विमा विकास अधिकारी रवींद्र पवार यांच्यातर्फे 1 लाखाचा अपघात विमा संरक्षण व मेहता इन्व्हेस्टमेंटचे संचालक मयूर मेहता यांच्यातर्फे डि-मॅट अकाऊंट ब्रोकरेज फ्री ओपन करून देण्याची मोफत सुविधा देण्यात आली होती. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी क्लब अध्यक्ष ऋषीकेश मोंढे, सचिव आनंद हासे, खजिनदार विश्वनाथ मालाणी, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, प्रकल्प प्रमुख डॉ. प्रमोद राजूस्कर, प्रकल्प समन्वयक डॉ. विकास करंजेकर, डॉ. विनायक नागरे, संदीप फंटागरे, इनरव्हीलच्या अध्यक्षा वृषाली कडलग, सचिव ज्योती पलोड, खजिनदार सुनीती गाडे यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी सर्व सहभागी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 3 Today: 1 Total: 30562

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *