म्हैसवळण घाट मार्गास क्रांतीवीर राघोजी भांगरे नामकरण काँग्रेस व आदिवासी संघटनांनी एकत्र येत दिली मानवंदना

नायक वृत्तसेवा, अकोले
काँग्रेस पक्षाने क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या कर्तृत्वाची अमरसाक्ष म्हणून लक्ष्मण साबळे व ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांच्या नेतृत्वाखाली म्हैसवळण घाट मार्गास क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे काँग्रेस व आदिवासी संघटना यांनी दिले.

आदिवासी तरुण व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकदर्‍याजवळील म्हैसवळण घाटाच्या तोंडाशी बिताका व पट्टाकिल्ला यांच्या मध्यवर्ती भागात एकत्र येऊन राघोजींच्या क्रांतीकारी कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, जिल्हा सरचिटणीस शिवाजी नेहे, संपत कानवडे, विक्रम नवले, रामदास धुमाळ, सुजित नवले, नवनाथ वाळुंज, साईनाथ नवले, भास्कर मंडलिक, भाऊसाहेब थोरात, मंजुळा साबळे, हेमंत साबळे, प्रभाकर मंडलिक, आवेज शेख, शब्बीर शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात लक्ष्मण साबळे यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने व 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे नाव म्हैसवळण घाटाला देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी आदिवासी माणसांच्या इतिहासाच्या पाऊल खुणा सुस्पष्ट करताना रामजी किरवा, रामजी भांगरा व जावजी बांबळा यांच्या क्रांतीकारी कर्तृत्वाची माहिती देऊन क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या क्रांती कार्याची सविस्तर माहिती विषद केली. ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे व भास्कर दराडे यांचीही भाषणे झाली. आदिवासी एकतेचा गजर करत, ढोल ताशांच्या गजरात म्हैसवळण घाटाला ‘क्रांतीवीर राघोजी भांगरे म्हैसवळण घाट मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी मुंबईचे आदिवासी सेवा संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

Visits: 233 Today: 1 Total: 2119265

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *