बाळासाहेब देशमाने यांनी गाव बांधिलकी जपली : श्रीमती वलवे

नायक वृत्तसेवा, धांदरफळ
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावासाठी उद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्या रूपाने रत्न लाभले आहे. गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्यासाठी ते सदैव तत्पर असतात. वृक्षारोपण, पर्यटन, तीर्थक्षेत्र ग्रामविकास यासारख्या कामामधील त्यांचा सहभाग वाखण्याजोगा आहे. असे व्यक्तिमत्व लाभणे म्हणजे गावाचे भाग्य असून देशमाने यांनी खऱ्या अर्थाने गाव बांधिलकी जपली असल्याचे गौरवोद्गार संगमनेर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा वलवे यांनी काढले.

तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे लोकमान्य विद्यालय व के.बी. दादा देशमुख महाविद्यालयातील इयत्ता दहावी, बारावीतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पाडला त्यावेळी श्रीमती नंदा वलवे बोलत होत्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य आर.एम. तथा रामहरी कातोरे म्हणाले, बाळासाहेब देशमाने यांच्या स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून लोकमान्य विद्यालय तसेच के.बी. दादा देशमुख महाविद्यालयातील गुणवंत गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी १५१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा हा सामाजिक उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण व्यवस्थेतून कोणताही विद्यार्थी बाहेर राहू नये, त्याला आपल्या मधील व इतर विद्यार्थ्यांमध्ये भेद निर्माण होऊ नये यासाठी बाळासाहेब देशमाने यांचा हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी मार्गदर्शक राहील असे सांगितले.

युवा उद्योजक ओंकार देशमाने म्हणाले, धांदरफळ या मायभूमीतून माझे वडील उद्योजक बाळासाहेब देशमाने यांनी याच विद्यालयातून शिक्षण घेऊन आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि धांदरफळ गावातून छोटेसे हॉटेल ते आज बांधकाम रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजक झाले आहे. समाजातील गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहू नयेत, त्यांना शिक्षण घेतांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जपून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा हा अभिनव उपक्रम गेल्या दहा वर्षापासून सातत्याने राबवत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत प्राचार्य डॉ. राजेंद्र वामन लिखित १०१ आजारावर योग उपचार उपाय पुस्तकांची भेट देण्यात आली.
यावेळी सरपंच उज्वला देशमाने, मुख्याध्यापक झावरे, योग प्रशिक्षिका सारिका परदेशी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या लता कातोरे, स्वदेश महिला मंचच्या अध्यक्षा संगीता देशमाने, नवनाथ देशमाने, मनोज कवडे, वंदना कवडे, माजी सभापती अनिल देशमुख, संतुजी नाईकवाडी, भिकाजी काळे, अशोकराव वलवे, रावसाहेब डेरे, शिरीष कवडे, नितीन देशमुख, डॉ. संजय थोरात, बाळासाहेब कवडे, विठ्ठल डेरे, भिकाजी काळे, नामदेव खुरपे, दीपक देशमुख, संतोष वीरेंद्र देशमुख, नाईकवाडी, लक्ष्मण काळे, अविनाश देशमुख, नवनाथ नाईकवाडी, सचिन देशमाने, मोहन देशमाने, राजेश शिंदे तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सदैव सामाजिक सेवाभावी संस्थेचे सचिव दत्ता कासार यांनी तर आभार दोरगे यांनी मानले.

Visits: 141 Today: 1 Total: 1105976
