अवघ्या पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना कोपरगावच्या जेलरला एसीबी कडून अटक..!

नायक वृत्तसेवा, कोपरगाव

दारुबंदीची चाप्टर केस बंद करण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्या कोपरगावच्या तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक व जेलर रविंद्र नारायण देशमुख (वय ४८) याला पाचशे रुपयांंची लाच स्वीकारतांना नाशिकच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याची माहिती पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिली.

या घटनेने कोपरगावच्या महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी देखील कोपरगाव तालुक्यातील दोन तलाठ्यांंनाही लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. आता आज चक्क जेलरच गळाला लागल्याने कोपरगाव महसूल विभागात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोल रुजली आहेत हे दिसून येत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी पढेगाव येथील तक्रारदाराकडून जेलर रविंद्र नारायण देशमुख (वय ४८) याने पाचशे रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांचेवर कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये दारुबंदीचा गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचेवर तहसीलदार कार्यालयात चॅप्टर केस पाठवण्यात आली होती. सदर चॅप्टर केस बंद करण्यासाठी जेलर रविंद्र देशमुख याने तक्रारदाराकडून पाचशे रुपये लाचेची मागणी करुन १२ ऑक्टोबररोजी रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे पंचांसमोर समक्ष स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

हॅश व्हॅल्यू व फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. या पथकात पोलीस निरीक्षक उज्ज्वल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पो.ह.वा. कुशारे, पो.ह.वा. गोसावी, पो.ना.महाजन, पो.ना. बाविस्कर, पो.ना. शिंपी यांचा समावेश होता. नाशिक लाच लुचपत परिक्षेत्राचे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उप अधीक्षक दिनकर पिंगळे आदिंच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत तहसीलदार योगेश चंद्रे यांचाही सहभाग होता.

Visits: 356 Today: 1 Total: 1915506

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *