दोन दिवस मिळालेल्या दिलाशाला लागला धक्का..! शहरातील ओहोटी कायम, मात्र ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी अचानक घटलेल्या रुग्णसंख्येतून संगमनेर तालुक्यातील नागरिकांना हायसे केल्यानंतर सोमवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे शहरापाठोपाठ तालुक्यातील कोविडचे संक्रमण आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आजच्या अहवालातून गेल्या दोन दिवस मिळालेल्या दिलाशाला काहीसा धक्का बसला आहे. आज खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले 20 अहवाल व रॅपिड अँटीजेन चाचणीतून निघालेले 29 जणांचे निष्कर्ष यातून शहरातील सात जणांसह 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडीत 3 हजार 504 रुग्णसंख्या गाठली आहे

गेल्या सप्टेंबरच्या 30 दिवसांत प्रति दिवस 51 रुग्ण या गतीने संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 531 रुग्णांची भर पडली होती. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी 46, त्यानंतर 51, 49 या गतीने रुग्णवाढीची श्रृंखला पुढेही कायम राहील्याने ऑक्टोबरमध्येही संगमनेरातील बाधितसंख्या नवा विक्रम करेल असेच वाटत होते. मात्र रविवारने संगमनेरकरांना मोठा दिलासा दिला. त्यानंतरच्या सोमवारनेही आदल्या दिनाचाच कित्ता गिरविल्याने संगमनेरची बाधित सरासरी सुरुवातीच्या पाचच दिवसांत तब्बल 10 रुग्ण प्रति दिवसाने कमी झाली होती. मात्र आजच्या अहवालातून तालुक्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा 49 रुग्णांची भर पडल्याने संगमनेरकरांची काहीशी निराशा झाली आहे. मात्र आजच्या अहवालाचे निरिक्षण केल्यास एकट्या गुंजाळवाडीतून तब्बल बारा रुग्ण समोर आलेले असल्याने तालुक्याची सरासरी घटल्याचे चित्र एक प्रकारे आजही कायम आहे. मात्र नागरिकांनी यापुढेही कोरोना आपल्या आजूबाजूला असल्याचे भान ठेवून सार्वजनिक वावर ठेवल्यास येत्या काही दिवसात कोरोनाची घरवापसी होण्याची शक्यता आजही कायम आहे.

आज खाजगी प्रयोगशाळेकडून 20 जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 29 जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील पंचायत समिती परिसरातील 40 वर्षीय तरुण, घोडेकर मळ्यातील 30 वर्षीय महिला, देवाचा मळा परिसरातील 23 वर्षीय तरुण, माळीवाड्यातील 64 वर्षीय महिला, विद्यानगर परिसरातील 46 वर्षीय तरुण व संगमनगर मधील 69 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय तरुण बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच तालुक्यातील सांगवी येथील 67 व 47 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 65 वर्षीय महिला, शेडगाव येथील 41 वर्षीय तरुण, खंदरमाळवाडी येथील 45 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 52 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण व 42 वर्षीय महिला, कवठे बुद्रुक येथील 32 वर्षीय तरुणासह 25 वर्षीय महिला,

नांदूर खंदरमाळ येथील 65 व 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, उंबरी बाळापूर येथील 60 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 33 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 44 वर्षीय तरुण, माळेगाव हवेली येथील 40 वर्षीय तरुण, तर गुंजाळवाडीत आज कोविडचा उद्रेक झाल्याचे दिसून आले असून तेथून तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात 85 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 35, 28 व 20 वर्षीय तरुण तसेच 60, 40, 35, 30, 25 व 18 वर्षीय महिला व बारावर्षीय बालिका, सुकेवाडी येथील 55 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 45 वर्षीय महिला, समनापुर येथील 51 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, घुलेवाडी येथील 61 व 52 वर्षीय इसम, वडगाव पान येथील 52 वर्षीय इसम, पळसखेड येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 67 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 31 वर्षीय तरुणासह 31 वर्षीय महिला व रायतेवाडी येथील 39 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आजही 49 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला असून बाधितांची संख्या 3504 वर जाऊन पोहोचला आहे.

सोमवारी (ता.5) संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात 2 हजार 963 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यातून 10.83 सरासरीने जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 321 रुग्ण समोर आले तर 2 हजार 642 जणांचे निष्कर्ष निगेटिव्ह आले. यातही संगमनेर तालुक्यात सर्वाधीक 660 अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या, त्यातून जिल्ह्यात सर्वात कमी दराने म्हणजे अवघ्या 4.70 टक्के दराने 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर अहमदनगर महापालिका क्षेत्रात 67 चाचण्यांतून 38.81 टक्के दराने 26 रुग्ण, शेवगाव तालुक्यात 55 चाचण्यांतून 34.55 टक्के दराने 19 रुग्ण, पाथर्डी तालुक्यातील 68 चाचण्यातून 27.94 टक्के दराने 19 रुग्ण तर नगर ग्रामीणमधून 30 चाचण्यातून 26.67 टक्के दराने 8 रुग्ण समोर आले. सोमवारी अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधीक रुग्णवाढीचा दर अहमदनगर महापालिका क्षेत्राचा होता, तर सर्वाधीक कमी दर संगमनेर तालुक्याचा होता. त्यातही जिल्ह्यात सर्वाधीक अँटीजेन चाचण्याही सोमवारी संगमनेरात झाल्या हे विशेष.

जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९०.६४ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत ४५२ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६८८ इतकी झाली आहे.

शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात ७५, खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून ७१ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज जिल्ह्यात ३०६ नवीन बाधीत आढळले.

शासकीय प्रयोगशाळेत आज केलेल्या चाचणीतून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २०, कर्जत ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी ०६, राहाता ०१, राहुरी ०५, श्रीगोंदा ०४, व लष्करी रुग्णालयातील २० रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत जिल्ह्यात आज ७१ रुग्ण आढळले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २०, अकोले ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०३, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता १५, राहुरी १३, संगमनेर ०१, श्रीरामपूर ०५ येथील रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील  विविध ठिकाणी  करण्यात आलेल्या  रॅपिड अँटीजेन चाचणीत ३०६ बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १५, अकोले १३, जामखेड ३६, कर्जत २२, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०९, पारनेर १४, पाथर्डी ३१, राहाता ५०, राहुरी ०९, संगमनेर २९, शेवगाव २५, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ११, व लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र ३१, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रा. ०१, नेवासा ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १७, व लष्करी परिसरातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या : ४२ हजार ८८०..
  • जिल्ह्यात  सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण : ३ हजार ६८८..
  • जिल्ह्यातील  आजवरचे एकूण मृत्यू : ७४१..
  • जिल्ह्यातील  आजवरची एकूण रुग्ण संख्या : ४७ हजार ३०९..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ९०.६४ टक्के..
  • जिल्ह्यात आज ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची नव्याने भर..

Visits: 25 Today: 1 Total: 118314

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *