चंपाषष्ठीनिमित्त येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर नेवासा बुद्रुकच्या पुरातन खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी


नायक वृत्तसेवा, नेवासा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबादेवाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरासह भंडारा व खोबर्‍याची उधळण करत लाखो भाविकांनी खंडोबा म्हाळसादेवी बानूमातेचे दर्शन घेतले. यानिमित्ताने मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती.

नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा म्हाळसादेवी, बानूमाता मंदिरामध्ये खंडोबा भक्त संभाजी ठाणगे यांच्या अधिपत्याखाली सकाळी 9.30 वाजता उद्धव महाराज मंडलिक, महंत सुनीलगिरी महाराज, गहिनीनाथ महाराज, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, कोंडीरामपेचे यांच्या हस्ते माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, काकासाहेब शिंदे, अंबादास इरले, संभाजी पवार, बाळासाहेब मारकळी, बदाम महाराज पठाडे, जानकीराम डौले, सुरेश लोखंडे, प्रसाद रहाट, अमृत रहाट, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत तळी भांडारचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तर नव्यानेच बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक, शिवाजी महाराज देशमुख, महंत सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

व्यासपीठ प्रमुख म्हणून कोंडीराम महाराज पेचे, विजय महाराज पवार यांनी सेवा दिली. तर श्री खंडोबा म्हाळसादेवी सच्चिदानंद बाबा व नारदमुनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुरलीधर कराळे, उपाध्यक्ष एकनाथ रेडे, सचिव सर्जेराव चव्हाण, सहसचिव गोकुळ जायगुडे, विश्वस्त प्रभाकर बोरकर, सुभाष जपे, गणपत नळकांडे, अशोक मारकळी, रमेश काशिद, नामदेव कुटे, एकनाथ डोहोळे, रावसाहेब पेचे, रंजना भाकरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. चंपाषष्ठीच्या निमित्ताने सकाळी पुरातन व नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबादेवाच्या मूर्तीसह म्हाळसादेवी, बानूमाता मूर्तीस वेदमंत्रांचा जयघोष करत अभिषेक घालण्यात आला. या दोन्हीही मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. पहाटेपासूनच येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

Visits: 213 Today: 1 Total: 2062118

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *