राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाखांचा अपहार नऊ जणांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपी फरार


नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाख 62 हजार 78 रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांत सोमवारी (ता. 14) संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, कर्मचारी व तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत.

कारभारी बापूसाहेब फाटक (व्यवस्थापक, रा. टाकळीमियाँ), भाऊसाहेब तुकाराम येवले (अध्यक्ष, रा. राहुरी), शरद लक्ष्मण निमसे (उपाध्यक्ष, रा.सह्याद्री नर्सरी, अस्तगाव, ता.राहाता), सुनील नारायण भोंगळ (लेखनिक तथा वसुली अधिकारी तथा दैनिक बचत प्रतिनिधी, रा.जोगेश्वरी आखाडा), उत्तम दत्तात्रेय तारडे (लेखनिक तथा कॉम्प्युटर ऑपरेटर, रा.केंदळ बुद्रुक), सुरेखा संदीप सांगळे (लेखनिक तथा कॅशिअर, रा.राहुरी), सुरेश मंजाबापू पवार (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा.जोगेश्वरी आखाडा), दत्तात्रेय विठ्ठल बोंबले (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा.सावेडी, अहमदनगर), दीपक संपतराव बंगाळ (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा.राहाता) अशी आरोपींची नावे आहेत.

संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक संजय पांडू धनवडे (वय 37, रा. सोनई) यांनी फिर्याद दिली आहे. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 दरम्यान कालावधीच्या लेखापरीक्षणात राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत 7 कोटी 37 लाख 62 हजार 78 रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणूक करून अपहार झाला आहे. त्यात वरील नऊ आरोपी सहभागी आहेत.

Visits: 182 Today: 1 Total: 2058231

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *