काकडी ग्रामस्थ आक्रमक; विमानतळाला ठोकणार टाळे?

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी विमानतळाशेजारी असलेल्या काकडी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी लगतच्या असणार्‍या गावांना स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यामुळे शिर्डीतील काकडी ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, पंधराशे एकर जमीन विमानतळाला देऊन तीन वर्षे उलटून गेली असताना सुद्धा ग्रामस्थांना फक्त आश्वासनेच दिली जात आहे.

शिर्डी विमानतळाच्या परिसरातील गावे विकसित करावीत. सर्व सुविधांयुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. महाराष्ट्रतील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी बसवावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या. मात्र, त्याचे पुढी काहीच होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिर्डी विमानतळ तयार होताना कवडीमोल दराने आम्ही आमच्या जमिनी दिल्या. मात्र, आज विमान प्राधिकरण आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. काकडी ग्रामपंचायतचा थकलेला साडेपाच कोटी रुपयांचा कर अजूनही दिला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जर पंधरा दिवसात ग्रामपंचायतचा विमानतळाकडून येणारा थकीत कर मिळाला नाही तर विमानतळाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा काकडी गावच्या सरपंच पूर्वा गुंजाळ यांनी दिला आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 79438

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *