साकूरमध्ये घरफोडी करुन दागिने व रक्कम चोरीला

साकूरमध्ये घरफोडी करुन दागिने व रक्कम चोरीला
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथील किशोर बनसोडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाट्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना शनिवारी (ता.3) मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, साकूर परिसरातील वनवेनगर येथे किशोर बनसोडे हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. त्यांनी बनसोडे वस्ती येथे नूतन घर बांधले आहे. त्यामुळे बनसोडे व त्यांची पत्नी यांनी घरातील सर्व साहित्य आटोपून सोन्याचे सर्व दागिने व पैसै कपाटात ठेवले होते. आणि ते वास्तूशांती करण्यासाठी बनसोडे वस्ती येथे गेले होते. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री घरात कुणी नसल्याचा फायदा उठवत अज्ञातचोरट्यांनी कडीकोयंडा तोडत आतमध्ये प्रवेश केला. कपाट उचकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला. पहाटे दोन वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी तातडीने घटनेची माहिती बनसोडे यांना दिली. दरम्यान, घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

Visits: 151 Today: 1 Total: 2235931

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *