‘उमेद’ संस्थेचे खासगीकरण करु नये ः उभेदळ
‘उमेद’ संस्थेचे खासगीकरण करु नये ः उभेदळ
नायक वृत्तसेवा, नेवासा
बचत गटांना मार्गदर्शक ठरलेल्या ‘उमेद’ संस्थेचे खासगीकरण करण्यात येऊ नये अशी मागणी आदर्शगाव सुरेशनगरच्या माजी सरपंच अनिता उभेदळ यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात उभेदळ यांनी म्हंटले की, नेवासा तालुक्यात सध्या 700च्या पुढे उमेद संस्थेचे बचत गट झालेले आहेत. त्यामुळे महिला एकत्र येऊन विचार विनिमय करून आपला प्रपंच चालवतात. या संस्थेमुळे महिलांचे सक्षमीकरण झाले असून या चळवळीमध्ये माजी सभापती सुनीता गडाख यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मात्र, ही संस्था बंद करून खासगीकरण करणार असल्याची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे नतालुक्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सुरेशनगर गावात एकूण 9 महिला बचत गट असून, महिला नियमित कर्ज घेतात व परतफेड करतात. त्यामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झाले असून सदरच्या संस्थेचे खासगीकरण करु नये. नाही तर पुन्हा सावकारशाही येईल अशी भीतीही महिलांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

