उत्तर प्रदेश सरकारचा राहुरीमध्ये काँग्रेसकडून निषेध
उत्तर प्रदेश सरकारचा राहुरीमध्ये काँग्रेसकडून निषेध
नायक वृत्तसेवा, राहुरी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून त्यांच्यासह प्रियंका गांधी यांना अटक केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलीस व सरकारचा राहुरी येथे काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको करुन निषेध करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांचाही निषेध करण्यात आला.
![]()
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त सकाळी अकरा वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून नगर-मनमाड महामार्गावर दहा मिनिटे रास्ता रोको केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, संजय पोटे, राजेंद्र बोरुडे, बाबासाहेब धोंडे, पंढरीनाथ पवार, नानासाहेब कदम, शशीकांत गाडे, संजय करपे, संजय विधाटे, बबन ढोकणे, अशोक गुंजाळ, अजित तारडे व इतरांनी आंदोलनात भाग घेतला. शेवटी तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

