चिखलीमधील रस्त्यांसाठी 33 लाखांचा निधी ः कातोरे

चिखलीमधील रस्त्यांसाठी 33 लाखांचा निधी ः कातोरे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद 5054 यांच्या निधीमधून चिखली ते वाडापूर रस्ता (18 लक्ष), वामन वस्ती ते चिखली रस्ता (10 लक्ष) तसेच सागर हासे यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता (5 लक्ष) असा एकूण 33 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व शॅम्प्रोचे अध्यक्ष रामहरी कातोरे यांनी दिली.


मंगळवारी (ता.29) चिखली येथे या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भास्कर सिनारे, आत्माराम हासे, विनोद हासे, सोमनाथ हासे, बाळासाहेब सहाणे, सागर हासे, बापू सहाणे, नितीन हासे, गणेश हासे, सूर्यभान सिनारे, पोपट सहाणे, सुरेश हासे, रवींद्र हासे, अशोक वामन, प्रवीण घोटेकर, सुनील हासे, बिबवे सर, सोमनाथ बादशहा हासे, नारायण हासे, लखन मेमाणे, सुनील मेमाणे, मनोज गाडेकर, अण्णा हासे, सुधीर मेमाणे, ग्रामसेवक आंबरे, ठेकेदार सोमनाथ गिते, हासे आदी उपस्थित होते.

Visits: 165 Today: 1 Total: 2122142

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *