विद्यार्थ्यांचे सरसकट शुल्क माफ करण्याची ‘छात्रभारती’ची मागणी
विद्यार्थ्यांचे सरसकट शुल्क माफ करण्याची ‘छात्रभारती’ची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संकटामध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क सरसकट माफ करा, महाविद्यालय बंद असतानाही घेतलेला विकासनिधी, सराव शुल्क फी, देखभालच्या नावाखाली घेतलेले सर्व शुल्क परत करण्यासह अतिरिक्त महाविद्यालये बंद करा; अशा विविध मागण्यांचे निवेदन छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आज (शुक्रवार ता.28) संगमनेर प्रांताधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत , शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.
कोरोनासारख्या महामारीत अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. यामुळे पालक व विद्यार्थी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. तरी सरकारने कोणतेही कारणे न देता सरसकट शुल्क माफ करावे. अन्यथा छात्रभारतीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे आदिंनी दिला आहे.