कौठे धांदरफळमध्ये ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
कौठे धांदरफळमध्ये ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कौठे धांदरफळ येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आहे.

जनसुविधा योजना सन 2018-19 आणि 14 व्या वित्त आयोग योजनेंतर्गत या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले. इमारत लोकार्पण प्रसंगी सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग घुले, सरपंच इंदू घुले, उपसरपंच गणेश घुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बाबासाहेब घुले, सोपान घुले, रमेश घुले, बाबासाहेब क्षीरसागर, संतोष घुले आदिंसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या इमारतीच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी पदाधिकार्यांसह अधिकार्यांचे आभार मानले आहे.

Visits: 105 Today: 2 Total: 1111849
