राहात्यातील तीन युवक बेपत्ता तालुक्यात उडाली एकच खळबळ

नायक वृत्तसेवा, राहाता
दहावीच्या परीक्षेचा निकाल आणण्यासाठी दोन मित्रांसह बाहेर पडलेला 16 वर्षांचा युवक आपल्या बेपत्ता झाला आहे. ही घटना राहाता येथे घडली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, राहाता येथील खंडोबा चौकातील दीपक विजय मोरे (वय 16), गणेश दिलीप बर्डे (वय 17), किसन रमेश कुर्‍हाडे (वय 17) अशी बेपत्ता असलेल्या युवकांची नावे आहेत. या संदर्भात दीपक मोरे याचे वडील विजय पुंडलिक मोरे यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 17 जूनला दीपक विजय मोरे हा दहावीची परीक्षा दिलेला विद्यार्थी सकाळी सातच्या सुमारास दाहवीचा निकाल आणतो असे सांगून आपल्या मोटारसायकलवरून (विना क्रमांकाची) मित्र गणेश दिलीप बर्डे व किसन रमेश कुर्‍हाडे यांच्यासह बाहेर पडला असता त्यांना कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. यावरुन पोलिसांनी गुरनं. 264/ 2022 भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे हे करत आहे.

यातील दीपक विजय मोरे हा 16 वर्षांचा असून त्याची उंची 5.5 फूट रंगाने गोरा, अंगात तपकिरी रंगाचा सदरा व निळ्या रंगाची विजार असे त्याचे वर्णन आहे. गणेश दिलीप बर्डे हा 17 वर्षांचा असून त्यांची उंची 5 फूट 6 इंच, रंगाने काळा सावळा, नाक सरळ, चेहरा उभट, केस वाढलेले अंगात काळ्या रंगाचा सदरा व पोपटी रंगाची विजार, पायात चप्पल असे त्याचे वर्णन आहे. किसन रमेश कुर्‍हे हा 17 वर्षांचा असून त्याची उंची 5.3 फूट असून रंगाने गोरा, चेहरा गोल, केस काळे मध्यम नाक, सरळ मिशी, अंगामध्ये शारदा महाविद्यालयाचा लालसर रंगाचा सदरा व लालसर रंगाची विजार आहे. दरम्यान यातील दीपक विजय मोरे हा दहावीच्या परीक्षेत नापास झाला असल्याने त्या दिशेने राहाता पोलीस तपास करत आहे.

Visits: 103 Today: 1 Total: 1106187

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *