अकोले तालुक्यात शनिवारी पंधरा बाधित सापडले
अकोले तालुक्यात शनिवारी पंधरा बाधित सापडले
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात शनिवारी (ता.26) सकाळीच अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त आलेल्या अहवालात 15 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अहवालांमध्ये कळस बुद्रूक येथील 48 वर्षीय महिला,23 वर्षीय महिला, बहिरवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगा, अकोले शहरातील 40 वर्षीय पुरूष, सुगाव बुद्रूक येथील 40 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय तरुण, रुंभोडी येथील 67 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, रेडे येथील 67 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, कळस खुर्द येथील 29 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील 62 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला अशा 15 व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1329 झाली आहे. यापैकी 1098 व्यक्ती बरे होऊन घरी परतले आहेत. तर 20 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 196 व्यक्ती उपचार घेत आहे.