कुरकुंडी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

कुरकुंडी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुंडी इसमाने आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना आज (गुरुवार, ता.24) सकाळी साडे दहा वाजेच्या पूर्वी घडली आहे.


याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुरकुंडी येथील शंकर रामभाऊ पवार (वय 60) यांनी गुरुवारी सकाळी साडे दहा वाजेच्या पूर्वी राहत्या घराच्या लोंखडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी मयत शंकर पवार हे घरातून बाहेर का आले नाही म्हणून कुटुंबियांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी आतून कडी लावली असल्याने शेवटी दरवाजा तोडून आतमध्ये जावून पाहिले असता तर त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी राजेश दत्तात्रय माळी यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास देशमुख हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *