अकोले तालुक्यात कोरोनाचा विसावा बळी

अकोले तालुक्यात कोरोनाचा विसावा बळी
नायक वृत्तसेवा, अकोले
एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाच बळींच्या संख्येतही भर पडत आहे. अकोले तालुक्यात एका माजी सैनिकाचा कोरोनाने बळी घेतला असून, तालुक्यात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या वीसवर पोहोचली आहे.


दरम्यान, बुधवारी (ता.23) 38 कोरोनाबाधितांची भर पडल्याने बाधितांची संख्या 1 हजार 242 वर जाऊन पोहोचली आहे. तर दुसरीकडे इंदोरी येथील 44 वर्षीय माजी सैनिकाचा नाशिक येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. हा बुधवारी घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये शहरातील 56 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय तरुण, 56 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 10 वर्षीय मुलगी, सुगाव बु. येथील 55 वर्षीय पुरूष, रुंभोडी येथील 45 वर्षीय महिला, राजूर येथील 40 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण, 34 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, गणोरे येथील 38 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथील 65 वर्षीय महिला, कुंभेफळ येथील 25 वर्षीय महिला, कोतूळ येथील 50 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 12 वर्षीय मुलगी, 07 वर्षीय मुलगा, निंब्रळ येथील 50 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष, 31 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला अशा 34 व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह आला. तर खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात कळस येथील 52 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय महिला, नवलेवाडी येथील 59 वर्षीय पुरूष, कोतूळ येथील 50 वर्षीय महिला अशा 4 व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने एकूण 38 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून, बळींची संख्या वीस झाली आहे.

Visits: 45 Today: 1 Total: 435790

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *